Now Reading:
तुमच्या हिरड्यांतून रक्त येण्याची ही कारणं तुम्ही ओळखली नसतील
तुमच्या हिरड्यांतून रक्त येण्याची ही कारणं तुम्ही ओळखली नसतील

दिवसातून दोन वेळा तरी ब्रश केलं पाहिजे हे तुम्ही ऐकलच असेल. पण हे करून देखील तुमच्या हिरड्यांना त्रास होऊन त्यातून रक्त येऊ शकतं, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

तुम्हाला वाटत असेल की फक्त जोरात ब्रश केल्याने रक्तस्राव होऊ शकतो तर असं नाही आहे. दातांमध्ये आणि हिरड्यांमध्ये बॅक्टेरीया राहिल्यामुळेही हिरड्यांमधून रक्तस्राव सूरु होऊ शकतो.

हळुवार ब्रश करण्याची गरज-

कधी जर घाई घाईत ब्रश केलत, तर एखादी जागा किंवा एखादा दात घासायचा राहून जाऊ शकतो. हळूवार ब्रश करा म्हणजे प्रत्येक जागा नीट स्वच्छ होईल.

हॉर्मोन्स कारणीभूत असतील-

यौवनात, रजोनिवृत्ती, सांधेय वेळी आणि बाळंतपणाच्या वेळी शरीरात हॉर्मोनल बदल होतात. त्यावेळेस हिरड्यातून रक्तस्राव होऊ शकतो.

तणाव आणि पुरेशी न मिळणारी झोप-

तणावामुळे जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर हेदेखिल एक कारण होऊ शकतं. तुमच्या जेवणात प्रथिने, हिरव्या भाज्या, व्हिटॅमिन C आणि D ची भर करा. याने दात मजबूत आणि तंदुरुस्त राहतील.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.