Now Reading:
किडनी स्टोन असलेल्या रुग्णांसाठी आहारासंबंधित ८ अत्यावश्यक टिप्स
किडनी स्टोन असलेल्या रुग्णांसाठी आहारासंबंधित ८ अत्यावश्यक टिप्स

रोजच्या धावपळीमध्ये आहार आणि दैनंदिन जीवनातील मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष व्हायला लागतं. अशाच अनियमित सवयींतून निरनिराळे विकार जडावतात. याचंच एक उदाहरण म्हणजे किडनी स्टोन अर्थात मुतखडा. किडनी स्टोन असलेल्या माणसाला आहाराचं काटेकोर पालन करणं अत्यावश्यक असतं. म्हणूनच घेऊन आलोय या आठ बहुगुणी टिप्स

१. दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवे. यामुळे मुतखडा तयार करणारी खनिजे विरघळवण्यासाठी मदत होते.

२. आहारातील मीठ कमी केल्याने लघवीतील कॅल्शियमचे प्रमाण नियंत्रणात आणण्यास मदत होते. चिकन, डबाबंद सूप, नुडल्स व खारट खाद्यपदार्थ सोडीअमयुक्त असतात.

३. दिवसभराच्या खाण्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असलेले किमान दोन पदार्थ खा. यामुळे शरीरामध्ये कॅल्शियमयुक्त किडनी स्टोन तयार होण्यास आळा बसतो. एक पेला दुधामध्ये ३०० मिग्रॅ कॅल्शियम असते.

४. पालक, स्ट्रॉबेरी, गहू, चहा या पदार्थांमध्ये ऑग्झॅलिक अॅसिड असतं. या पदार्थांचं प्रमाण कमी ठेवल्यास लघवीमधील ऑग्झॅलेटचे प्रमाण नियंत्रणात ठेवता येते. ऑग्झॅलेट किडनी स्टोनच्या वाढीस कारणीभूत असतात.

५. मानवी शरीर ‘व्हिटॅमिन सी’ चं रुपांतर ऑग्झॅलेटमध्ये करतात. त्यामुळे किडनी स्टोन असलेल्या व्यक्तीने व्हिटॅमिनच्या गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

६. साखरसुद्धा कॅल्शियमच्या खड्यांच्या निर्मितीस कारणीभूत ठरते. त्यामुळे किडनी स्टोन असलेल्या व्यक्तीने साखरेच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे.

७. मांस, अंडी व माश्यांसारख्या इतर मांसल प्रथिनांमध्ये प्युरीन असते. प्युरीन लघवीमधील युरीक अॅसिडची फोड करते. तसेच या प्रथिनांमुळे कॅल्शियमच्या खड्याचाही त्रास होऊ शकतो.

८. गहू, ज्वारी, बाजरीमधील फायबर लघवीतील कॅल्शियमचं प्रमाण कमी करण्यास उपायकारक आहे. हे फायबर आतड्यांमध्येच कॅल्शिअमशी रासायनिक प्रक्रिया करतं व मलविसर्जनामार्फत शरीराबाहेर पडतं.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.