Now Reading:
आपल्या मुलांसाठी व्हा, ‘मित्र, तत्वज्ञ व वाटाड्या’
आपल्या मुलांसाठी व्हा, ‘मित्र, तत्वज्ञ व वाटाड्या’

मुलं कुमारवयात, तरूणाईत फारच चंचल असतात. एक चुकिचं पाऊल आणि ते वाईट मार्गाला लागू शकतात. अशा वेळी त्यांना बाबापेक्षा एक वाट दाखवणारा, त्यांच्या मनाची चलबिचल समजणारा मित्र हवा असतो. मग कसा सोडवायचा हा पेचप्रसंग? वाचा-

१. चुका करू द्या

मुलांना चुका करण्याचे स्वातंत्र्य देणे मुलांच्या जडणघडणीसाठी आवश्यक असते. चुकांतूनच माणूस घडतो.

२. खऱ्या जगाशी सामना 

पालक सतत आपल्या मुलांना समाजातील क्रौर्यापासून सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. परंतु, जमेल तिथे आपल्या समस्यांना सामोरं जाण्यास त्यांना प्रवृत्त करावं. यातून एखाद्या कठीण प्रसंगी धाडसी निर्णय घेण्याची क्षमता उत्पन्न होईल.

३. आत्मपरिक्षण

स्वतःला ओळखता येणं, आपलं सामर्थ्य, कमजोरी माहीत असणं व्यक्तिमत्त्व विकासास पुरक असते.

४. आवडीनिवडी जाणून घ्या

तुमच्या मुलाला खेळाची आवड असेल. गाण्याची, कलेची किंवा वाचनाची आवड असु शकते. जे काही असेल त्यात प्राविण्य मिळवण्यासाठी त्यांना लागेल ती मदत करा. त्यांच्याशी या विषयावर नियमितपणे चर्चा करा.

५. संवाद साधा

मुलांशी संवाद साधणे वाटते तितके सोपे नाही. एका पालकासाठी आपल्या तरूण मुलाचा मित्र होताना बऱ्याचदा ‘जेनरेशन गॅप’ आडवा येतो. तो पार केला की सगळं सोप्पं होतं.

६. सार्वजनिक उपक्रम

त्यांना अधूनमधून सार्वजनिक उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहन द्या. यातून परोपकारी भाव जागृत होतो.

७. पैसा

त्यांना छोटेमोठे पैशाचे व्यवहार हाताळायला द्या. पॉकेटमनी काटकसरीने कसा वापरता येईल याबाबत त्यांच्याशी चर्चा करा.

८. स्तुति करा

शक्य तेव्हा त्यांच्या मतांना वाव द्या. काही चांगलं काम केल्यावर त्यांची स्तुती करा. मग ते कितीही लहानसहान काम का असेना.

९. मैत्रीचे धडे

आपले मित्र कसे निवडावेत, मैत्री कशी जपावी याबद्दल त्यांना मार्गदर्शन करा.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.