Now Reading:
डोळ्याखालील काळे डाग घालवण्यासाठी ५ सोपे घरगुती उपाय
डोळ्याखालील काळे डाग घालवण्यासाठी ५ सोपे घरगुती उपाय

डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्याचा त्रास महिला आणि पुरुषांमध्ये सामान्य आहे. डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जसं तणाव, झोप पूर्ण न होणे, हॉर्मोनल बदल. पण जर वेळेवर उपचार नाही केला तर तुमचा एकूण चेहरा काळवंडलेला दिसू शकतो. जर तुमच्या डोळ्यांखाली सुद्धा काळे डाग येताना दिसत असतील आणि रासायनिक क्रिमचा वापर टाळायचा असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आता तुम्ही घरगुती उपाय करून डोळ्याखाली दिसणाऱ्या काळ्या डागांपासून मुक्ती मिळवू शकता.

१. बदामाचं तेल

बदामाचं तेल पूर्णतः नैसर्गिक आहे. बदामाचं तेल डोळ्याखालच्या घेरांवर लावून मालिश करा. रात्रभर तेल तसेच राहू द्या. सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवा. ही प्रक्रिया डाग नाहीसे होईपर्यंत दररोज करा.

२. काकडी

चित्रपटात जश्या नटी डोळ्यांवर काकडीच्या पाती ठेऊन आराम करताना दिसतात तसं तुम्ही देखील करू शकता. काकडीच्या जाड चकत्या कापा आणि फ्रिजमध्ये अर्धा तास थंड करा. चकत्या थंड झाल्या की १० मिनिटे डोळ्यांवर ठेवा.

३. बटाटा

बटाटा बारीक किसून त्याचा रस काढा. कापसाचा बोळा या रसात भिजवून डोळ्याखालील काळ्या डाांवर चोळा. १५ मिनिटांनंतर साध्या पाण्याने डोळे धुवा.

४. गुलाबाचं पाणी

गुलाबाचं पाणी नैसर्गिक आणि सुगंधित असतं. कापसाचा बोळा गुलाब पाण्यात भिजवून १५ – २० मिनिटे डोळ्यांवर ठेवा.

५. टोमॅटो

टोमॅटो त्वचेसाठी उपयोगी मानला जातो. चमचाभर टोमॅटोचा रस आणि अर्धा चमचा लिंबूचा रस एकत्र करा. डोळ्याच्या खाली या रसाने मालिश करा. १0 मिनिटांनंतर डोळे स्वच्छ पाण्याने धुवा.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.