Now Reading:
महाराष्ट्राची ‘दंगल गर्ल’ कोमल जाधव
महाराष्ट्राची ‘दंगल गर्ल’ कोमल जाधव

‘दंगल’ चित्रपटात दाखविलेल्या बाप लेकीच्या कथेप्रमाणेच एक खराखुरा संघर्ष आपल्या महाराष्ट्रात देखील सुरु आहे. हे आहेत पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे राहणारे दत्तात्रय जाधव आणि त्यांची मोठी कन्या कोमल. चित्रपटात जसे हरियाणाचे महावीर फोगाट कुस्तीमध्ये देशासाठी सुवर्ण पदक जिंकण्याचा कठोर निश्चय करतात, तशीच जिद्द मराठमोळ्या दत्तात्रय यांच्या निर्धारात ही आहे.

तेसुद्धा कुस्तीपटू (wrestling) आहेत. दत्तात्रय यांना पहिली मुलगी झाली. मुलगी झाली म्हणून निराश न होता, लहानपणापासूनच त्यांनी कोमलला कुस्ती शिकवण्यास सुरुवात केली. सामाजिक विरोधाला बळी न पडता, त्यांनी आपल्या मुलीच्या कुस्ती प्रशिक्षणावर सखोल भर दिला. त्यानंतर दत्तात्रय यांना दोन मुले झाली. तेसुद्धा मोठी बहिण कोमलसोबत कुस्तीचे धडे गिरवू लागले.

चित्रपटात दाखविल्याप्रमाणे जाधव कुटुंबाच्या कुस्ती प्रवासात खूप साम्य आहे. कोमलला आंतरराष्ट्रीय मॅटवरील कुस्ती खेळण्याचा अनुभव आहे. २०१५ साली कोमल यंगून म्यानमार एशियन गेम्समध्ये, तर दुसऱ्या वेळी किरगीजस्थान येथे वर्ल्ड नोमाड गेम्स येथे मॅटवरील बेल्ट रेसलिंग स्पर्धा खेळून आली. जाधव कुटुंबाच्या घरी पदक आणि पारितोषिके यांचा कमी ढीग नाही. मारकड कुस्ती केंद्राचे तिन्ही मुलांच्या यशात मोठे योगदान आहे. दुसरा मुलगा रोहित दोन वेळा राष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळून आला आहे. धाकट्या मुलाने सहा वेळा बेल्ट रेसलिंगमध्ये नॅशनलवारी केलेली आहे.

Cover Image Source

Input your search keywords and press Enter.