Now Reading:
कोंडा कायमचा घालवण्यासाठी घरगुती उपाय
कोंडा कायमचा घालवण्यासाठी घरगुती उपाय

तुमच्या सुंदर कपड्यांवर पडणाऱ्या कोंड्याला त्रासला आहात का? तर तुमच्या सुटकेसमध्ये आले आहेत हे घरगुती उपाय जे तुम्ही झटपट वापरू शकाल.

१. नारळाचं तेल आणि मध-

नारळाचं तेल, मध, ऑलिव्ह ऑइल आणि दह्याचे मिश्रण करा. हे मिश्रण तुमच्या टाळूला लावून १० मिनिटे मसाज करा. ३०-४५ मिनिटांनंतर केस धुऊन टाका आणि टॉवेलने हळुवारपणे पुसून घ्या.

२. दही-

शॅम्पूने केस धुतल्यानंतर ते नीट सुकवा. त्यानंतर दही टाळूवर लावून १५ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर अगदी कमी प्रमाणात शॅम्पू वापरून पुन्हा केस धुवा. 

३. हिना-

हिना, आवळा पावडर, चहा पावडर, लिंबू आणि नारळाचे तेल मिक्स करा. हे मिश्रण केसांना थोड्या वेळासाठी लावून आणि नंतर कमी शॅम्पू वापरून धुऊन टाका.

४. सफरचंद-

सफरचंदाचा रस आणि पाणी समान प्रमाणात एकत्र करा आणि केसांना लावा. १५ मिनिटांनंतर धुऊन टाका. कोंडा नाहीसा होईल. 

५. संत्र्याचे साल व लिंबू-

सुकलेल्या संत्र्याच्या सालाची पेस्ट करून त्यात ४-५ चमचे लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण ३० मिनिटे केसांना लावून धुऊन टाका. आठवड्यातून असे दोन तीनदा केल्याने कोंडा नाहीसा होईल.

Input your search keywords and press Enter.