Now Reading:
केसांच्या लट (Bangs) कापा घरच्या घरी
केसांच्या लट (Bangs) कापा घरच्या घरी

आता घरातल्या घरात लट कापणं झालाय अगदी सोपं. प्रत्येक वेळा पार्लर मध्येच जाऊन केसांना लट देणं गरजेचं नाही तर आता तुम्हाला घरातच हेअर स्टाईल करता येईल. स्वतःचे केस कापताना साहजिकच तुम्हाला भीती वाटत असेल. केस कसे कापले जातील? वर खाली कापले जातील का? किंवा वाकडे तिकडे होतील?असे अनेक प्रश्न तुमच्या मनात डोकावत असतील.

पण घाबरू नका, परफेक्ट लट (Bangs) कापायला आज आपण शिकूया?

 

१. केस कापण्यासाठी लागणाऱ्या वस्तू-

आरसा आणि कात्री, सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी. एक बरोबर उंचीइतका आरसा घ्या, ज्यात तुम्हाला स्वतःचे केस नीट दिसून शकतील. आरश्यासोबतच साजेशी कात्री पण घ्या, ज्याने लट कापणं कठीण नाही होणार.

 

२. केसांना एक वळण द्या-

लट कापण्याच्या आधी केस नीट विंचरा म्हणजे त्यांना एक वळण राहील. लक्षात ठेवा लट कापण्याच्या आधी केस सुखे असले पाहिजेत.

 

३. तुमच्या जवळ क्लिप्स असू द्या-

जेव्हा तुमचे लट कापून होतील, तेव्हा ते कुर्वळण्याची शक्यता आहे. किंवा ते हवेने विस्कटू ही शकतात. त्याचमुळे, त्यांना क्लिप्स लावून मागच्या केसांसोबत पिनअप करून घ्या. ज्याने, जेव्हा केस सोडायची वेळ असेल तेव्हा ते जाग च्या जागी  राहतील.

Cover Image Source: Facebook 

Input your search keywords and press Enter.