Now Reading:
रेसिपी : चविष्ट पण हटके मसाला फ्रेंच फ्राइज
रेसिपी : चविष्ट पण हटके मसाला फ्रेंच फ्राइज

फ्रेंच फ्राइज म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण, दरवेळेस मॅकडॉनल्डमध्ये जाऊन फ्राइज खाणं शक्य नसतं. अनेकदा तर मुलं मॅकडीमध्ये जाण्याचा हट्टच धरतात. अशावेळी जर तुम्ही घरच्या घरीच त्यांना फ्राइज खाऊ घातले तर मुलंही खूश आणि त्यांच्या पोटात बाहेरचे पदार्थ नाही गेले म्हणून तुम्हीही खूश. पण आज हेच फ्राइज हटके पद्धतीने करण्याची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे मसाला फ्रेंच फ्राइज केवळ मुलांच्याच नाही तर तुमच्याही तोंडाला पाणी आणतील.

साहित्य

मोठे लांबट आकाराचे चार बटाटे, लाल मिरची पावडर, काळी मिरी पावडर, आमचूर पावडर, कॉनफ्लॉवर, ओरिगॅनो किंवा सुकलेल्या पुदीन्याची पावडर किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्याकरिता तेल

कृती 

१. सुरुवातीला व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे बटाट्याच्या उभ्या कापा करून घ्या. बाजारात तुम्हाला फ्राइज कटरही मिळते. यामुळे समान आकाराचे फ्राइज कापले जातात.

२. कापलेल्या बटाट्यांच्या कापांमध्ये २ टेबल्स्पून बारीक मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा. ४-५ मिनिटांनंतर कापा एका कपड्यावर किंवा ताटात काढून पसरवाव्यात, जेणकरून अतिरिक्त पाणी भांड्यात राहिल. यानंतर दुसरा कपडा घेऊन कापांवर दाबावा. याने बटाट्यातील पाणी खेचून घेतले जाईल.

३. तीन चमचे कॉनफ्लॉवरमध्ये चवीनुसार मिरची पावडर, १ टेबलस्पून काळी मिरी आणि आमचूर पावडर, ओरिगॅनो टाकून मिक्स करा.

४. आता वरील मिश्रण बटाटाच्या कापांवर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.


५. गरम तेलात मध्यम आचेवर एक-एक बटाट्याच्या कापा सोडून तळा.

सॉससोबत गरमागरम, कुरकुरीत मसाला फ्रेंच फ्राइज खाण्यासाठी तयार आहेत.

Cover Image Source

Input your search keywords and press Enter.