Now Reading:
सदैव निरोगी राहण्यासाठी सोप्या नियमांतून घ्या स्वतःच्या आरोग्याची काळजी
सदैव निरोगी राहण्यासाठी सोप्या नियमांतून घ्या स्वतःच्या आरोग्याची काळजी

धूळ- माती, ऊन- पाऊस, हिवाळा काहीही असो, तुम्हाला तुमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी प्रत्येक दिवशी लागलेली असते. पण जर त्यांच्या बालपणापासून तुम्ही त्यांना चांगल्या सवयी लावल्यात तर ते निरोगी राहण्यास मदत होईल.

दातांची स्वच्छता

सगळ्यात प्रथम सवय म्हणजे दात स्वच्छ ठेवणे. प्रत्येक माणसाने दिवसातून दोन वेळा तरी ब्रश केलंच पाहिजे. याने दात किडले जाणार नाहीत आणि मुखातून दुर्गंध देखील येणार नाही. तरी गरज लागलीच तर, दिवस भरात मुखवास खात राहणे हा एक पर्याय.

नियमित आंघोळ करा

दुसरी सवय म्हणजे दररोज स्वच्छ आंघोळ करणे. काही लोक रोज आंघोळ करूनही, व्यवस्थित शरीर साफ करत नाहीत ज्यामुळे ऍलर्जी पसरू शकतात. हात, पाय, नाक, कानामागचा मळ, बेंबी, काखेखालची बाजू नीट साबणाने साफ करणे, हे तुमच्या मुलांना शिकवणं गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या मुलांना सुगंधित साबण आणि शॅम्पू द्याल तर अगदीच बरं. आंघोळीनंतर स्वच्छ धुतलेले कपडे घालणं हेही तितकंच गरजेचं आहे, नाही तर त्वचारोग होण्याची शक्यता असते. 

हात स्वच्छ धुवा

भोजनाआधी व नंतर हात धुणे अगदी गरजेचे आहे. यामुळे जर हातावर कोणते जंतू (बॅक्टेरिया) असतील तर ते अन्नातून पोटात जाणार नाहीत. अश्या काही सोप्या पण गरजेच्या सवयी तुमच्या मुलांनी आचरणात आणल्या तर ते सुदृढ होतील.

Input your search keywords and press Enter.