Now Reading:
चपाती की भात? वजन कमी करण्यासाठी कोणाचा धरावा हात?
चपाती की भात? वजन कमी करण्यासाठी कोणाचा धरावा हात?

काय यार!!! मागच्या सेलमध्ये घेतलेली कुर्ती आता फिट होत नाहीये. तो टॉप सुद्धा आता अल्टर करायला झालाय. शी बाबा! आता डाएट करायला हवय!! पण आता हे आईला कोण सांगेल? तिला तर नेहमीच मी वाळलेली दिसते. सांगू तरी काय? भात कमी करायचा की चपाती? आयडिया!! तिला हे वाचायला सांगते-

भात की चपाती?

chapati rice

आता वजन घटवायच्या युद्धात प्रमुख शत्रू म्हणजे कार्बोहायड्रेट्स. पण आपल्याकडील बहुतेक पक्वानात तांदूळ किंवा गव्हाचा वापर होतो त्यामुळे भात किंवा चपाती पूर्णतः वर्ज्य करणे पण शक्य नाही.

तसं पाहायला गेलं तर एकीकडे चपातीमध्ये १९० मिग्रॅ सोडिअम असतं १२० ग्रॅम गव्हामध्ये तर भातामध्ये सोडिअमचं प्रमाण अगदी क्वचितच असतं. पण मग भात की चपाती या वादात नेहमी चपाती का जिंकते?

आकडेवारीचा काटा-

chapati rice

१/३ कप भातामध्ये ८० कॅलरीज, १ ग्रॅ प्रथिने, ०.१ ग्रॅम चरबी, १८ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स तर एक लहान ६ इंची चपातीमध्ये ७१ कॅलरीज, ३ ग्रॅम प्रथिने, ०.४ ग्रॅम चरबी व १५ कार्बोहायड्रेट्स तसेच २ ग्रॅम फायबर असतात. त्यामुळे चपातीमुळे तुम्हाला बराच वेळ भूकही लागत नाही. म्हणून वजन कमी करण्यासाठी चपातीची निवड केली जाते.

आठच्या आत पोटात-

हो! याचा अर्थ हा नाही की तुम्ही ताटात चपातीचा ढिग रचाल, दिवसाला चार चपात्या पुरेशा आहेत. आणि जर तुम्ही रात्रीच्या जेवणात फक्त चपाती खाणार असाल तर रात्रीचे जेवण हे ८ वाजताच व्हायला हवे.

Input your search keywords and press Enter.