Now Reading:
उद्योग क्षेत्रातील ६ गुरुमंत्र जे प्रत्येक महिलेला यश संपादन करण्यासाठी ठाऊक हवे!
उद्योग क्षेत्रातील ६ गुरुमंत्र जे प्रत्येक महिलेला यश संपादन करण्यासाठी ठाऊक हवे!

पूर्वी उद्योग क्षेत्रात महिलांची संख्या फारच नगण्य होती. पण आता दिवसागणिक जास्तीत जास्त महिला उद्योग क्षेत्राकडे वळत आहेत. ही एक स्वागतार्ह गोष्ट आहे पण, या सोबतच महिलांनी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांना आपलं ध्येय गाठण्यास मदत होईल.

 

१. आवड महत्वाची-

झटपट पैसे मिळवून देणाऱ्या योजनांच्या मागे धावू नका. नफा मिळायला थोडा अवधी हा द्यावाच लागतो. बहुतेक वेळा लगेच पैसे न मिळाल्याने तुम्ही लवकरच नांगी टाकतात. पण जर तुमचा व्यवसाय तुमच्या आवडीवर आधारित असेल तर तुम्ही अधिकाधिक वेळ परिस्थितीशी झुंज देऊन यश मिळवणारच!

 

२. जोखीमांशी मैत्री-

जेव्हा तुम्ही स्वतःच्या वेगळ्या अशा रस्त्यावर चालू लागता तेव्हा पावला पावलावर संकटं येऊन  उभी राहतात आणि त्यातून बाहेर पडायला अकल्पित जोखीम घ्यावी लागते. म्हणून प्रथम त्या जोखीमांशी मैत्री करा.

 

३. समीक्षणाला सामोरे जा-

करून दाखवणारे थोडे थोडके असले तरी सांगणारे बरेच असतात पण त्यांच्या बोलण्याने खचून न जाता, लोक काय म्हणतात त्याकडे लक्ष द्या व त्याप्रमाणे स्वतःचं विश्लेषण करून सुधारणा करा.

 

४. शिकण्याची तयारी-

रोज नवीन काहीतरी शिकण्याची तयारी ठेवा. प्रत्येक दिवस कोऱ्या पाटीने सुरु करा व दिवसाअखेर त्यावर माहितीचे रेघोटे ओढा.

 

५. चांगली संगत-

आपण ज्यांच्यासोबत वावरतो ते आपल्या विचारांना चालना देतात. सदैव सकारात्मक, स्वप्नाळू आणि कर्तबगार व्यक्तींची सोबत ठेवा. तुमच्या नकळत तुम्ही त्यांच्या चांगल्या गुणांचं अनुकरण करायला लागाल!

 

६. स्वतःकडे दुर्लक्ष करू नका-

बऱ्याचदा कामाचा रगाडा इतका वाढतो की आपलं स्वतःकडे दुर्लक्ष होतं. तुमच्या आवडीनिवडी विसरू नका. स्वतःसाठी वेळ काढा. सुट्टी घ्या आणि फ्रेश राहा. शेवटी तुमचं आरोग्य व सुख तुमच्या व्यवसायाच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.