Now Reading:
बजेट २०१८: जेटलींच्या बजेटमध्ये गरजूंच्या आरोग्यास ५ लाखांचा दिलासा
बजेट २०१८: जेटलींच्या बजेटमध्ये गरजूंच्या आरोग्यास ५ लाखांचा दिलासा

१० कोटी गरीब व गरजू कुटुंबांना राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत विमा देण्यात येईल असे अरुण जेटली यांनी बजेटच्या भाषणात जाहीर केले.

 

बजेटमधील तरतुदी-

ही विमा योजना सर्वात मोठी सरकार अनुदानित आरोग्यविमा योजना असल्याचा दावा केला जात आहे आणि याच्या साहाय्याने हॉस्पिटलमध्ये तसेच दुय्यम व तृतीय दर्जाच्या दवाखान्यात उपचारास मदत होईल. जेटलींच्या मते देशातील किमान ५० कोटी जनतेची यामार्फत मदत करता येईल.

 

माता व लहान मुलांना दिलासा-

जेटली यांनी आयुष्यमान भारत उपक्रमाची घोषणासुद्धा केली. ज्या अंतर्गत मातांना व लहान मुलांना आरोग्य सेवा पुरवण्यात येतील. यासोबतच नवीन वैद्यकीय महाविद्यालये व इस्पितळांची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच, जिल्हा रुग्णालयांची सुधारणा करण्यात येणार आहे. 

 

रुग्णांना पोषक आहार-

देशभरात दीड लाखांहून जास्त आरोग्य व जनकल्याण केंद्रे उभारली जाणार आहेत. त्यासाठी १२०० करोड रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच टीबी रुग्ण आणि इतर रुग्णांना मुलभूत आहार मिळत नाही त्यासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. या रुग्णांना पोषक आहार पुरवण्यासाठी या योजनेअंतर्गत उपचारादरम्यान दरमाह ५०० रुपये प्रत्येक रुग्णाला दिले जातील.

 

नव्या रोजगारास प्रोत्साहन-

सरकारला समाजहितवादी उपक्रमांतून मदत करावी असे अर्थ मंत्र्यांनी खासगी क्षेत्राला आवाहन केलंय.

तसेच आरोग्यसेवांचा पुरवठा व आरोग्यविमा योजना नव्या रोजगाराला वाट करून देणार आहे. यातून तळागाळातील प्रत्येक भारतीयाला आपल्या पायावर उभं राहण्यास मदत करणार आहे.

Input your search keywords and press Enter.