Now Reading:
गर्भवती महिलांसाठी श्वसनाचे प्रकार
गर्भवती महिलांसाठी श्वसनाचे प्रकार

बाळंतपणात शारीरिक व्यायामाची गरज तर असतेच पण त्याच बरोबर श्वसनाचे प्रकार केल्याने बरेच फायदे होतात. जसं रक्तप्रवाह वाढतो, ऑक्सिजनचं (oxygen) प्रमाण वाढतं, ताण तणाव कमी होतो. आणि हे श्वसन प्रकार तुम्ही कुठेपण- कधीपण करू शकता. योगने श्वसन क्रियेला खूप मदत होऊ शकते. 

 

प्राणायाम-

योगमध्ये प्राणायाम महत्त्वाचा मानला जातो. प्राणायामाने नियंत्रित श्वसन क्रिया तयार होते. आपण सहसा खूप घाईघाईत श्वास घेत असतो, ज्यामुळे पुरेसं ऑक्सिजन शरीराला मिळत नाही. प्राणायामाने श्वसनाकडे लक्ष राहतं. तुम्हाला आणि तुमच्या बाळाला पुरेशा ऑक्सिजनची गरज असते.

 

पोटातून श्वास घेणं-

व्यवस्थित एका जागेवर मांडी घालून बसून घ्या. आता दीर्घ श्वास घेऊन पोट फुलवून घ्या. मग श्वास सोडा, ही प्रक्रिया काही मिनिटांसाठी करत राहा. तुम्ही हा व्यायाम झोपून देखील करू शकता.  

 

छातीतून श्वास घ्या-

सरळ ताठ उभे राहा. तोंडानी १० सेकंद मोजून श्वास घ्या आणि हात छातीवर ठेऊन घ्या, पण जास्त जोर नका देऊ. थोडा वेळ श्वास रोखून ठेवा आणि मग हळू हळू सोडत जा. ही प्रक्रिया थोडा वेळ करत राहा.

Input your search keywords and press Enter.