Now Reading:
‘तिचे’ही असू शकते तुमच्यावर प्रेम हे सांगणाऱ्या महत्त्वाच्या खुणा
‘तिचे’ही असू शकते तुमच्यावर प्रेम हे सांगणाऱ्या महत्त्वाच्या खुणा

‘काय रे कसल्या एवढ्या विचारात बसलायस?’

‘अरे, काही कळायला मार्ग नाही रे..’

‘का रे? काय झालाय असं’

‘आता तुच सांग ना, गेले चार महिने आम्ही चॅट करतोय. अधून मधून हिन्ट देते ती, पण खात्रीशीर काही कळत नाही रे.’‘ओह, प्रेमाचा मामला हा.. फार गंभीर समस्या आहे तर.’

‘हो ना यार.. काय करू तुच सांग आता.’

‘एक काम कर. खाली दिलेल्या गोष्टी वाच, बघ ती यापैकी एखादी हिन्ट देते का ते.’

‘काय आहे हे?’

‘वाच तर’

तिला तुम्ही आवडता हे दर्शवणारी ८ लक्षणे

१. केसांच्या बटांशी लडिवाळ खेळ करणे

जर ती बोलता बोलता तिच्या केसांशी लडिवाळपणे खेळतेय याचा अर्थ तिला तुमची सोबत आवडते. मुलींचे केस त्यांची मानसिकता दर्शवतात. तुम्हाला भेटायला येताना त्या निरनिराळ्या स्टाइल करून येत असल्यास हे त्यांना तुम्ही आवडत असल्याचे लक्षण आहे. 

२. भुवया उंचावणे 

जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक रहस्यमय स्मित उमटते. तसेच अधूनमधून त्या भुवया उंचावून तुम्हाला न्याहाळत असतात. हे त्यांच्या ‘इंटरेस्ट’चे लक्षण असू शकते. 

३. पलट 

हे तुम्हाला नव्याने सांगायला नको. ‘डीडीएलजे’मध्ये शाहरुखने सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकमेकांच्या शेजारुन गेल्यावर काही अंतरानंतर ती वळून पाहत असल्यास तुमची तिच्या मनात एन्ट्री नक्की झालीच म्हणून समजा. 

४. प्रत्येक क्षणाची माहिती ठेवणे 

तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण, निर्णयाची माहिती त्यांना हवी असते. तुम्ही आज काय करताय, काल काय केले उद्या कुठे जाणार. तुमच्या आवडीनिवडी अशा प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना इत्तंभूत माहिती ठेवायची असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या तुमच्याशी सतत चॅट करत असल्यास त्यांना तुम्ही आवडता. आता तुम्हाला गाठी भेटींचे पुढचे पाऊल उचलण्यास हरकत नाही. 

५. सवय जडणे 

त्यांच्या वागण्यात तुमच्या सवयी आपोआप झळकायला लागतात. तुमच्या आवडीचा शब्द किंवा असंच काहीतरी आपोआप त्यांच्या तोंडातूनही निघायला लागतो. याची जाणीव त्यांनाही नसते हे मानसिक पातळीवर आपोआप घडत जाते आणि त्या कधी तुमच्यामध्ये समरस होतात त्यांनाही कळत नाही.

६. पानचट जोकवर हसणे 

तुम्ही कितीही पानचट विनोद केला त्यावर बाकी कोणी हसो न हसो त्या अगदी खळाळून हसणार. मुलींना सहसा विनोदबुद्धी असणारी मुले आवडतात. त्यांना तुमचा स्वभाव पसंत असल्याची ही खूण आहे. 

७. प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणे 

ज्या व्यक्तीस तुम्ही आवडता ती तुमची कोणतीच गोष्ट विसरत नाहीत. मग तो तुमचा वाढदिवस असो, तुमच्या पहिल्या भेटीचा दिवस, तुमच्या लांबच्या मित्राचा वाढदिवस असं सगळं सगळं त्यांच्या मेंदूमध्ये कॉम्प्युटरसारखे साठवलेले असते. एखाद्या महत्त्वाच्या कामाचा एकवेळेस तुम्हाला विसर पडेल पण त्या अगदी न चुकता तुम्हाला आठवण करून देतील. 

८. वागण्यात बदल 

तुम्ही जवळपास असल्यावर त्यांच्या वागण्यात विलक्षण बदल दिसतो. तुम्ही सोबत असलात की ती फार उत्साहित दिसते. त्यांची बोलण्याची ढब बदलते. त्यांच्या आवाजात विलक्षण लडिवाळ स्वर अनुभवायला मिळतो.  

‘हा यार! सेम असंच घडतंय माझ्यासोबत’

‘पटलं ना?’

‘नाहीतर काय! सॉलिड आहेस रे तू’

‘मग आता वाट कसली पाहतोयस. जाऊन बोलून टाक’

Cover Image Source

Input your search keywords and press Enter.