Now Reading:
‘ब्लड मून २०१८’: चंद्रग्रहण पाहायचं राहिलं? चिंता नको, पाहा ही जगभरातील रक्तचंद्राची आकर्षक छायाचित्रे
‘ब्लड मून २०१८’: चंद्रग्रहण पाहायचं राहिलं? चिंता नको, पाहा ही जगभरातील रक्तचंद्राची आकर्षक छायाचित्रे

जगाने काल रात्री निसर्गाच्या अद्भूत सौंदर्याचा अनुभव घेतला. औचित्य होते खग्रास चंद्रग्रहणाचे. गेल्या १०४ वर्षांतील सर्वात दीर्घकाळ दिसणाऱ्या या चंद्रग्रहणाकडे सगळ्यांचीच नजर होती. प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार हा रम्य आविष्कार पाहण्यासाठी निरभ्र जागा गाठली होती.

ठिक १० वा. ४४ मिनिटांनी सुरु झालेल्या या ग्रहणाने रात्री १ वा ५१ मिनिटांनी पूर्णतः काळोख केला होता. लालभडक दिसणाऱ्या या रक्तचंद्राची जगभरातील छायाचित्रकार आतुरतेने वाट पाहत होते.

भारतीयांनाही हे चंद्रग्रहण अनुभवायला मिळाले. पाहुया भारतामध्ये हे चंद्रग्रहण कसे दिसले.

१. गुलाबी शहर असे संबोधले जाणाऱ्या जयपूर राजस्थानमधील तरुणाने टिपलेला हा फोटो

२. चंद्रग्रहणाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा टाइम लॅप्स व्हिडीओ

३. भारताचा मुकुटमणी जम्मू आणि काश्मिरमध्ये चंद्रकलांचे स्वर्गसमान सौंदर्य

सोशल मीडिया वर लोक विविध ढंगातील फोटो टाकून हा क्षण साजरा करत होते. या ऐतिहासिक क्षणाचे आपणही साक्षीदार आहोत या भावनेत न्हाऊन निघत होते.

पाहुया तर पृथ्वीवरील विविध देशांमध्ये हे ग्रहण कसे दिसले.

४. पाहा टर्कीमधील हा नयनरम्य देखावा

५. जर्मनीच्या समुद्रकिनाऱ्यावरील हा विलोभनीय लालबुंद चंद्र

View this post on Instagram

Total Lunar Eclipse Over Germany HECHINGEN, GERMANY – JULY 27: A Blood Moon rises behind The Hohenzollern Castle, the ancestral seat of the Prussian Royal House and of the Hohenzollern Princes, situated at the periphery of the Swabian Alb on July 27, 2018 in Hechingen, Germany. The period of totality during this eclipse, when Earth's shadow is directly across the moon and it is at its reddest, will last 1 hour, 42 minutes and 57 seconds, making it the longest viewable lunar eclipse this century. (Photo by Matthias Hangst/Getty Images) #gettyimages #gettysport #gettyimagesde #nikon #nikoneurope #nikonproeurope #nikonusa #becreative #instafollow @gettyimages #bloodmoon #lunareclipse #totallunareclipse #burghohenzollern

A post shared by mhangst (@matthias.hangst) on

६. रशियाच्या गजबजलेल्या शहरातून डोकावणारा चांदोबा

७. स्वित्झर्लंडमधील या छायाचित्रकाराने टिपलेले हे दृश्य सोशल मीडियावर होतंय व्हायरल

View this post on Instagram

✨ 🖼 Dreamy night everyone…☺️🌔😍✨

A post shared by Senai Senna (@sennarelax) on

८. सोन्याचे शहर संबोधले जाणाऱ्या दुबईमध्ये फोटोमध्ये कैद केलेले हे अविस्मरणीय दृश्य

View this post on Instagram

Shot the bloody moon 😤

A post shared by ALPHA SPOTTING (@alphaspotting) on

या पर्वामध्ये डिजिटल कलाकरांनीही मनसोक्त आनंद लुटला. चंद्राच्या प्रतिमा विविध छायाचित्रांमध्ये गुंफून घडवलेली ही अद्भूत डिजिटल चित्रे पाहताच नजरेत भरतात.

९. अमेरिकेतील गोल्डन गेट ब्रिजमागून डोकावणाऱ्या चंद्राचे चित्र

१०. आयफेल टॉवरला पाहण्याचा मोह कदाचित या चंद्रालाही आवरला नसावा. म्हणूनच जणू हा चंद्र रात्रीच्या अंधारात सावध पावलांनी येऊन चोरट्या नजरेने निद्रावस्थेत असलेल्या पॅरिसचे सौंदर्य पाहतोय, असे या चित्रातून व्यक्त होतेय.

११. विमानाच्या खिडकीतून असा चंद्र दिसला तर?

असे हे खग्रास चंद्रग्रहण रात्री २ वा ४३ मिनिटांनी संपले. पुन्हा ०३.४९ ला खंडग्रास चंद्रग्रहणास सुरुवात होऊन ०४.५८ वाजता संपले. हे ग्रहण तुम्ही चुकवले असल्यास पुढचा रक्तचंद्र पाहण्यासाठी सप्टेंबर २०२५ पर्यंत वाट पाहावी लागेल.

Cover Image Source: auerimages

Input your search keywords and press Enter.