Now Reading:
वसंत ऋतूमध्ये या पाच ठिकाणांना भेट द्याच
वसंत ऋतूमध्ये या पाच ठिकाणांना भेट द्याच

स्प्रिंग म्हणजेच वसंत ऋतू. वसंत ऋतूची खासियत म्हणजे या काळात अनेक रंगबेरंगी फुले पाहायला मिळतात. काही कवींना वसंत ऋतूमध्ये फुलांसारख्याच कविता सुचतात. पण या कवींप्रमाणे प्रत्येक व्यक्ती वसंत ऋतूचा आनंद घेऊ शकत नाही. तुम्हाला रंगीबेरंगी डेसी, ट्यूलिप आणि रांगेत फुलणाऱ्या फुलांचा आनंद घायचा असेल तर पुढे वाचा. कारण आम्ही तुम्हाला भारतातील ५ सुंदर ठिकाणं सांगणार आहोत ज्याचा आनंद तुम्ही वसंत ऋतूमध्ये घेऊ शकता.

दार्जिलिंग

दार्जिलिंग प्रवाशांसाठी नेहमीच एक असं गंतव्यस्थान ठरलंय जिथे संपूर्ण वर्षभर प्रवासी आकर्षित होत असतात. पण चहा प्रेमींसाठी फेब्रुवारी आणि मार्च महिना दार्जिलिंगला भेट देण्यास सर्वोत्तम काळ आहे. वर्षाची हीच वेळ आहे जेव्हा पहिल्यांदा चहाची लागवड केली जाते.

वायनाड

केरळला जसे ‘गॉड्स ओन कंट्री’ (देवांचे शहर) म्हटले जाते. तुम्ही केरळमध्ये वसंत ऋतूतील सर्वोत्तम सौंदर्य देखील पाहू शकता. केरळचे वायनाड देखील भारतामध्ये वसंत ऋतुंसाठी प्रसिद्ध आहे. इकडच्या टेकड्यांवरची हिरवळ आणि वन्य जीवन खूप प्रसिद्ध आहे.

कसोल

हिमाचल प्रदेशमधील कसोल हा हिवाळ्यातील अत्यंत थंड प्रदेश आहे. परंतु, वसंत ऋतू येताच कसोलची सुंदरता दुप्पट वाढते. हे भारतातील सर्वोत्तम स्प्रिंग डेस्टिनेशन्सपैकी एक आहे.

झिरो व्हॅली

अरुणाचल प्रदेशमधील झिरो व्हॅली भारतातील सर्वात सुंदर स्थळ आहे. हे ठिकाण त्याच्या ‘झिरो फेस्टिव्हल’साठी देखील प्रसिद्ध आहे. येथे चार बाजूंनी असलेली हिरवळ आणि नैसर्गिक सुंदरता डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. मार्च ते मे या दरम्यान आपण गेलात तर थंड घाटातील हवेचा आनंद तुम्ही उपभोगू शकाल.

गोवा

तसं तर गोव्याला तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये भेट देऊ शकता. परंतु वसंत ऋतूमध्ये येथे भेट देण्याची मजा काहीच वेगळीच आहे. मार्च महिन्यात येथे होणाऱ्या शिगमो फेस्टिव्हलमध्येही तुम्ही सहभागी होऊ शकता. जवळजवळ १५ दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये जगभरातून लोक येतात.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.