Now Reading:
या ५ योग मुद्रा करा आणि अवघ्या ५ मिनिटांत करा आजारपणावर मात
या ५ योग मुद्रा करा आणि अवघ्या ५ मिनिटांत करा आजारपणावर मात

प्रवासात, ऑफिस, कॉलेज कुठेही वावरताना जर आरोग्यावर ताबा मिळवता आला तर किती मस्त ना? तर करा या ५ योग मुद्रा व उत्तम आरोग्याकडे एक सुदृढ पाऊल उचला.

ज्ञान मुद्रा-

Yoga mudra

ज्ञान मुद्रेमुळे एकाग्रता, स्मरणशक्ती व ज्ञान वाढण्यास मदत होते. ही मुद्रा बसल्यावर, उभ्याने किंवा झोपून कधीही करू शकता केवळ पाठ सरळ ठेवावी. ज्ञान मुद्रा करण्यासाठी अंगठ्याच्या टोकाला तर्जनी जोडावी व इतर बोटे ताठ असावीत. हे करत असताना श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा.

प्राण मुद्रा-

Yoga mudra

प्राण मुद्रा केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते व डोळ्यांचं आरोग्य सुधारतं तसेच ताजेतवाने वाटते. प्राण मुद्रा करण्यासाठी अंगठ्याच्या टोकाला अनामिका व करंगळी जोडा आणि इतर दोन बोटं ताठ ठेवा. ही मुद्रा झोपून करू नये.

पृथ्वी मुद्रा-

Yoga mudra

पृथ्वी मुद्रा आयुष्यात संतुलन साधायला मदत करते. तसेच यामुळे थकवाही जाणवत नाही. पृथ्वी मुद्रा करताना अंगठ्याच्या टोकाला अनामिका जोडा व इतर बोटं ताठ ठेवा. पृथ्वी मुद्रासुद्धा झोपून करू नये.

वायू मुद्रा-

Yoga mudra

वायू मुद्रा शरीरातील हवा खेळती ठेवते तसेच सांधेदुखी, अंगदुखीवर मदत करते. वायू मुद्रा करण्यासाठी तर्जनी अंगठ्याच्या सांध्याशी स्पर्श करा व इतर तीन बोटं सरळ ठेवा.

सूर्य मुद्रा-

Yoga Mudra

सूर्य मुद्रा शरीरातील उष्णतेवर नियंत्रण ठेवते, चयापचय क्षमता सुधारते ज्याने वजन नियंत्रणात आणण्यास मदत होते. सूर्य मुद्रा करण्यासाठी अनामिका अंगठ्याच्या बुंध्याशी स्पर्श करा व अंगठ्याने हळुवारपणे अनामिकेवर दाब द्या. थकवा जाणवत असल्यास ही मुद्रा करू नये.

 

Input your search keywords and press Enter.