Now Reading:
चीटर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा पर्दाफाश; काय आहे प्रकरण?
चीटर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा पर्दाफाश; काय आहे प्रकरण?

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कॅप्टन स्टीव्ह स्मिथच्या टीममधील कॅमेरॉन बँक्रॉफ्ट या गोलंदाजाला चेंडूवर टेप लावताना कॅमेरात पकडण्यात आलं.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत बॉल टॅम्परिंग (चेंडूश छेडछाड) केल्याप्रकरणी कर्णधार स्टिव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन ब्रँक्रॉफ्ट हे गोत्यात आले. त्यामुळे स्टिव्ह स्मिथला कर्णधार तर डेव्हिड वॉर्नरला उपकर्णधारपद सोडावे लागले.

बॉल टॅम्परिंग प्रकरणी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक वर्षांची बंदी घातली आहे. यामुळे स्मिथ आणि वॉर्नरचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. स्मिथचे ३.५ मिलियन डॉलर्सचे (सुमारे २३ कोटी रुपये) तर वॉर्नरचे २.९ मिलियन डॉलर्सचे (सुमारे २० कोटी रुपये) नुकसान होणार आहे. या प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक डेरेन लेहमन याची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही तेच प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहेत.

एका पत्रकार परिषदेदरम्यान २८ वर्षीय स्मिथने त्याच्या चुकीची मंजुरी दिली. बॉल टॅम्परिंग हे क्रिकेटपटूंच्या तत्वांविरुद्ध असून ते खेळाच्या दृष्टीने बेकायदेशीर असल्याचेही त्याने मान्य केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमन मंडळाने स्मिथला निलंबित करत त्या सामन्याचे त्याचे मानधन काढून घेतले. तर ब्रँक्रॉफ्टच्या मानधनातून ७५ टक्के दंड आकारण्यात आला.

दरम्यान, सदरलँड यांनी रविवारनंतरचा दिवस ऑस्ट्रेलियासाठी खूपच कठीण राहिल्याचे म्हटले. तसेच त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्यावतीने देशवासीय आणि क्रिकेट चाहत्यांची माफी मागितली. विशेष करुन त्या मुलांची जे क्रिकेटवर प्रेम करतात.

Input your search keywords and press Enter.