Now Reading:
फक्त केक बनवण्यासाठीच नाही तर बेकिंग सोड्याचा असाही उपयोग करता येतो
फक्त केक बनवण्यासाठीच नाही तर बेकिंग सोड्याचा असाही उपयोग करता येतो

केक आणि बिस्किट बनवताना तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर अनेक वेळा केला असेलच. पण बेकिंग सोड्याचे अजून बरेच वापर आहेत. 

 

१. तेलकट केसांपासून मुक्ती-

फणीवर थोडाफार बेकिंग सोडा शिंपडा आणि फणीने केस विंचरा. याने तेलकट केस सुंदर आणि मोकळे दिसतील.

२. दुर्गंधी चपलांपासून मुक्ती-

खूप दिवस न धुतलेल्या चपला असतील आणि त्यातून दुर्गंध येत असेल तर बेकिंग सोडा तुमच्या कामी येऊ शकतो. थोडावेळ चपलांवर सोडा शिंपडून ठेवा आणि दुर्गंधविरहित चपला घालायला तयार व्हा.

३. त्वचेसाठी स्क्रब-

तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या एक्सफॉलिएटरमध्ये थोडासा बेकिंग सोडा मिसळून तुमच्या त्वचेवर स्क्रब सारखा वापरा. 

४. स्वच्छ पायांसाठी-

तुम्हाला तुमचे पाय स्वच्छ ठेवायचे असतील तर गरम पाण्यात सोडा टाकून पाय बुडवा. तुमचे पाय तरोताजा होतील. 

५. तेलकट हात-

स्वयंपाक करताना तुमचे हात तेलकट झाले असतील आणि फक्त पाण्याने ते धुतले जात नसतील तर हा उपाय तुमच्या कामी येईल. हातावर बेकिंग सोडा चोळून घ्या आणि त्यानंतर ते पाण्याने धुवा. याने हातावरचं तेल निघून जाईल.

Input your search keywords and press Enter.