Now Reading:
चुटकी सरशी बनवा चमचमीत वांग्याचे भरीत
चुटकी सरशी बनवा चमचमीत वांग्याचे भरीत

अगदी झटपट होणारं वांग्याचं भरीत हे सोपं, चविष्ट आणि आरोग्याला पूरक असं आहे. भरीत करण्याची कृती अगदी साधी आणि सहज करता येईल अशी आहे. जवळपास १० ते १५ मिनिटांत ही रेसिपी तयार होते.

 

साहित्य-

१. वांगी

२. बारीक चिरलेला कांदा

३. कोथिंबीर

४. चिरलेली मिर्ची

५. मीठ

६. दही

कृती-

१. सर्वात आधी भरीताचं वांग घेऊन त्याला सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घ्या.

२. त्यानंतर गॅसवर ठेऊन त्याला गोल फिरवून खरपुस भाजून घ्या. वांगे पूर्ण करपणार याची काळजी घ्या.

३. भाजून झाल्यावर ते डिशमध्ये घेऊन त्याची साल काढून घ्या.

४. वांगे नीट मऊ झालं की त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाका.

५. हे मिश्रण एकत्रित केल्यावर त्यावर कोथिंबीर आणि मीठ टाका.

६. आणखी एक पर्याय म्हणजे दही. तुम्हाला एक वेगळी चव हवी असेल तर तुम्ही या मिश्रणात दही पण घालू शकता.

हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून झाल्यावर तयार आहे चविष्ट भरीत. भाकरी बरोबर भरीत वाढा आणि पहा सगळे कसे बोटं चाटून तुम्ही केलेलं वांग्याचं भरीत खातील.

Cover Image Source

Input your search keywords and press Enter.