Now Reading:
तुमच्या बाळाच्या उत्तम झोपेसाठी ५ आयडिया; जेणेकरून ना तुमची झोपमोड होईल ना त्याची
तुमच्या बाळाच्या उत्तम झोपेसाठी ५ आयडिया; जेणेकरून ना तुमची झोपमोड होईल ना त्याची

पालक झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस बाळाच्या मध्यरात्री अवेळी जागण्याने हैराण व्हायला होतं. अर्थातच यात त्या कोवळ्या जीवाची काही चूक नसते पण, बाळाला योग्य व उत्तम झोप मिळावी यासाठी आपण खालील गोष्टी करून पाहा, आणि कळवा काही बदल होतो का ते-

 

१. कपड्याने गुंडाळा-

बाळ ५ महिन्याचे होईपर्यंत त्याच्यामध्ये दचकल्यास लगेच प्रतिक्रिया देण्याची क्षमता अंगीभूत असते. त्यामुळे झोपेत जेव्हा पडल्यासारखे वाटत असल्यास ते चटकन जागे होतात. त्यासाठी बाळाला जर मऊ ब्लॅंकेटमध्ये गुंडाळल्यास त्यांच्या हातापायांची हालचाल कमी होते परिणामी त्यांची झोपमोड होत नाही.

 

२. दिवसातील झोपेचं प्रमाण-

बाळाचं दिवसातील झोपेचं प्रमाण थोडं कमी असावं. बाळाला घड्याळ कळत नसतं त्यांची सगळी हालचाल सवयींवर आधारित असते. म्हणून त्यांना नेमक्या वेळी जेवण नेमक्या वेळी मालिश आणि मग झोप फार गरजेची असते.

 

३. डायपर बदलणे-

मध्यरात्री बाळ जागं झाल्यावर पहिले त्याचे डायपर बदला मग स्तनपान करा. कारण जर स्तनपान केल्यावर डायपर बदलले तर बाळाला चटकन झोप लागणे कठीण होते कारण तोवर ते पूर्ण जागे झालेले असतील.

 

४. झोप समजा-

तुमचं बाळ जेवढं जास्त झोपवणार तेवढं ते जास्त झोपणार. जर तुम्ही त्याला जागं ठेवून दमवून झोपी नेण्याचा प्रयत्न केलात तर बाळाला झोपी जायला त्रास होणार व ते जास्त वेळ झोपणारही नाही.

 

५. घाई करू नका-

कधी कधी बाळ मध्यरात्री उठतं थोडी चुळबुळ करतं तेव्हा लगेच बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे बाळाची झोपमोड होऊ शकते. कधी कधी ते चुळबुळ करून पुन्हा झोपी जातं. अशा वेळी थोडा संयम बाळगावा. जेणेकरून बाळाला स्वतःहून झोपी जायची सवय लागेल.

Input your search keywords and press Enter.