Now Reading:
सतत झोप येतेय? आजमावून पाहा या ५ नैसर्गिक गोष्टी
सतत झोप येतेय? आजमावून पाहा या ५ नैसर्गिक गोष्टी

एखाद्या रात्री झोप पूर्ण झाली नाही तर दुसऱ्या दिवशी दिवसभर डोळ्यावर झापड येणे सर्वसामान्य गोष्ट आहे. पण हेच जर रोजच्यारोज होत असेल तर त्यावर तुम्हाला उपाय करणे गरजेचे आहे. म्हणूनच दिवसा येणारी झोप आणि सुस्ती यावर मात करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय घेऊन आलो आहोत-

झोप नियंत्रणात आणा

 

रात्री पुरेशी झोप न मिळाल्याने बऱ्याचदा दिवसभर आपण पेंगत राहतो. म्हणून रात्रीच्या वेळेस किमान ६-७ तासांची झोप पूर्ण करा. झोपण्यापूर्वी फोन वापरणे, टिव्ही बघणे या क्रिया शक्यतो टाळा.

सकारात्मक ऊर्जा

जर तुम्ही प्रत्येक गोष्टीस नकारात्मक दृष्टीने पाहात असाल तर आता वेळ आलीय तुमच्या जीवनशैलीत बदल करण्याची. आपल्या दिनक्रमात शारीरिक व मानसिकदृष्ट्या सकारात्मक उपक्रमांची वाढ करा. योग, सेल्फ-हेल्प पुस्तकांचं वाचन, प्राणायाम इत्यादी तुम्हाला सकारात्मक विचार करण्यास मदत करतील.

ताण, भीती, राग आणि चिंता

या सर्वांमुळे तुम्ही अस्वस्थ, उदासिन होता. तुम्हाला जी काही समस्या त्रास देतेय त्यावर मित्रांशी बोला, डाॅक्टराची मदत घ्या. मनातील भावनिक गदारोळ थांबवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करून मन स्थिर ठेवा.

हलका आहार

जर तुम्हाला वाटतंय की, प्रमाणापेक्षा जास्त जेवल्याने तुम्हाला दिवसभर सुस्ती येतेय तर तुम्ही सकाळची न्याहारी करताना भरपेट खा आणि दुपारच्या जेवणात नेहमीपेक्षा कमी आहार घ्या.

नियमित व्यायाम

नियमित व्यायामाने शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटते.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.