Now Reading:
अवनी चतुर्वेदीची अपूर्व भरारी; हवाई दलाचे लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट!
अवनी चतुर्वेदीची अपूर्व भरारी; हवाई दलाचे लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट!

जामनगरच्या एअर बेसवरून अवनी चतुर्वेदी या महिला वैमानिकाच्या रूपात एका नवीन इतिहासाने उड्डाण घेतली. ती ठरलीय लढाऊ विमान चालवणारी पहिली भारतीय महिला वैमानिक.

भारतीय हवाई दलाच्या ‘मिग-२१ बायसन या लढाऊ विमानातून अवनीने ही विक्रमी भरारी घेतली.

लढाऊ विमानांचे पंख महिलांसाठी खुले

अवनी चतुर्वेदी, भावना कंठ आणि मोहना सिंग या तीन महिला वैमानिकांनी (Pilot) लढाऊ विमान उडवण्यासाठी कठोर प्रशिक्षण घेतलं होतं. जुलै २०१६ मध्ये त्यांना फ्लाइंग ऑफिसर या पदावर नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांची विलक्षण कामगिरी पाहून सरकारने वर्षभरातच लढाऊ विमानांचा विभागही प्रायोगिक तत्वावर महिलांसाठी खुला केला.

हवाई दलाची पुढील तुकडी तयार

भारतीय हवाई दलाने लढाऊ विमानांसाठी तीन महिला वैमानिकांची पुढील तुकडीसुद्धा निवडली आहे. आता भारतीय महिला आकाशात अजून उंच भराऱ्या घेताना दिसतील.

अशा उत्तुंग भरारी घेणाऱ्या या महिलेस आमचा सलाम!

Input your search keywords and press Enter.