Now Reading:
मजबूत, चमकदार केसांसाठी केळं फायदेशीर
मजबूत, चमकदार केसांसाठी केळं फायदेशीर

केळं हे फळ बहुतेकांच्या आवडीचं असतं. पोट खराब झाले असेल किंवा शरीरात लोहाची कमतरता असेल तर केळ फायदेशीर ठरतं. याव्यतिरीक्त वजन कमी करण्यासाठीही त्याचा फायदा होतो. पण तुम्हाला माहित आहे का केळ्याने केसांनाही फायदा होतो?

हे आहेत केसांना केळ लावण्याचे ५ फायदे:

केस चमकदार दिसतात

जर हवेने तुमचे केसांचे घरटे होत असेल तसेच केसांमध्ये पोषक तत्वांची कमतरता असेल तर केळ आणि अंड्याचं मिश्रण करून लावा. याने केस सुंदर आणि चमकदार दिसतील.

केसांना मजबूती मिळते

केस सुखे आणि राकट झाले तर ते सांभाळणे कठीण होतं. बाजारामध्ये असे काही प्रॉडक्ट आहेत ज्यांनी केसांचा राकटपणा जाऊ शकतो. मात्र त्याव्यतिरीक्त घरच्याघरी केळ आणि मध मिसळून केसांवर लावल्याने केसांचा सुखेपणा लवकर निघतो.

कोंडा आणि केस गळती

उन्हाळा असो किंवा हिवाळा कोंड्याचा त्रास कधीही होऊ शकतो. केळ्यामध्ये जीवनसत्व असतात ज्यांनी त्वचेला मऊपणा येतो. याने कोंडा आणि केस गळतीचा त्रास थांबतो.

केसांची वाढ होते

केळ्यामुळे नुसतीच केसांची गळती थांबत नाही तर उत्तम वाढीसही उपयुक्त ठरतं. केळ्यात दही मिसळून ते केसांना लावून १५ मिनिटे ठेवा. तुम्हाला काही दिवसात घनदाट केस दिसतील.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.