Now Reading:
गर्मीवर उपाय: आमचूर पावडरचे १० फायदे
गर्मीवर उपाय: आमचूर पावडरचे १० फायदे

आपण उन्हाळयात घराबाहेर जाणं टाळतो आणि घरात अधिकाधिक वेळ घालवणं पसंत करतो. या वर्षी आम्ही तुमच्यासाठी एक वेगळा उपाय घेऊन आलोय ज्याने तुम्ही उन्हाळ्याचा सामना करू शकता. तेही घरगुती गोष्टीमधून. स्वयंपाकाला चटकदार चव आणणारी आमचूर पावडर तुम्हाला उष्ण तापमानात थंडावा मिळवण्यास मदत करेल.

१. फळांचा राजा

उन्हाळ्याचा महिना म्हटलं की पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे आंबा. आंब्याने बनते आमचूर पावडर.

२. शरीरात निर्जंतुक उत्तेजित करणे

आंब्यामध्ये ए, सी, डी आणि बी – ६ जीवनसत्व असतं. यांच्या मदतीने शरीरातील निर्जंतुक गोष्टींपासून मुक्ती मिळते.

३. पचनक्रिया सुधारते

गर्मीशी लढताना आमचूर पावडर तुमच्या शरीराला थंडावा देतं. याच बरोबर ते पचनक्रिया सुधारतं आणि अॅसिडीटीपासून मुक्ती देतं.

४. स्कर्व्ही या रोगावरती इलाज

आमचूर पावडर आणि गुळाला एकत्र मिसळून दररोज झोपण्याआधी प्यायल्याने स्कर्व्ही हा रोग बरा होतो.

५. नजर सुधारते

आमचूर पावडरमध्ये अ, ई जीवनसत्व जास्त प्रमाणात आहे, जे निरोगी दिसण्यासाठी आणि त्वचेसाठी आवश्यक असतं.

६. कर्करोग प्रतिबंधित करते

यामध्ये कर्करोगाच्या विरोधात लढण्यास मदत करणारे क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतं आणि ते या जीवघेण्या आजारापासून मुक्ती देऊ शकतं.

७. रक्तदाब आणि डायबीटीस

आमचूर पावडर अतिरिक्त रक्तदाब आणि डायबीटीस रोखण्यास मदत करतं.

८. एलर्जीवर परिणामकारक

बाळंतीण महिलांनी आमचूर पावडर आहारात सामील केल्याने त्यांना हॉर्मोनल बदलाने होणारा त्रास कमी होतो. जर शरीरात काही एलर्जी असतील तर त्या पण निघून जातील.

९. निरोगी हृदय –

आयुर्वेदात असं सांगितल आहे की, निरोगी हृदयासाठी आमचूर पावडरचा वापर करावा.

१०. वजन कमी करण्यास मदत

आमचूर पावडरने मेटाबॉलिझम वाढत आणि वजन कमी होण्यास मदत होते.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.