Now Reading:
भारतातील पहिली महिला अग्निशामक
भारतातील पहिली महिला अग्निशामक

आजच्या काळात महिलांनी खूप प्रगती केली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आजच्या स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. तरीही काही अशा गोष्टी अथवा अशी काही कामे आहेत जी स्त्रियांना करु दिली जात नव्हती. त्यातील एक काम म्हणजे अग्निशामन केंद्रातील जवानांचे. पण आता भारतातील एका विमानतळावरील व्यवस्थापनाने आपल्या विमानतळासाठी एक महिला अग्निशामक नेमली आहे. भारतातील अग्निसुरक्षेची काळजी घेणाऱ्या भारतीय विमानपत्तन प्राधिकरणातील ३३१० अग्निशामक जवानांमध्ये तानिया सान्याल ही एकमेव महिला अग्निशामक आहे.

बदलले नियम


महिलांची या कामानिमित्त नियुक्ती करण्यासाठी काही मुलभूत नियम बदलावे लागले, असे भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरुप्रसाद मोहपत्रा यांनी सांगितले. नियम बदलल्यावरच तानियाची नेमणूक करण्यात आली. नियमांच्या बाबतीत उंची आणि वजनाची मापदंडे शिथील केली असली तरी पुरुष आणि महिलांचे कामाचे स्वरुप सारखे ठेवण्यात आले. या नोकरीच्या पात्रतेसाठी पुरुषांचे वजन किमान ५० किलो तर महिलांचे किमान ४० किलो असावे.

अग्निशामकांची उणीव


सध्या भारतात सुरु करण्यात येणाऱ्या मोठ्या संख्येवरील विमानसेवेमुळे विमानतळावर अग्निशामकांची उणीव भेडसावते आहे. या कारणांमुळेच महिलांनाही या कामासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सांगण्यात येत आहे. भविष्यात अजून महिला अग्निशामकांची भरती करणार असल्याचेही समजते.

तानियाची प्रतिक्रिया

कोलकत्त्यात जन्म झालेल्या तानियाने आपले पदव्युत्तर शिक्षण वनस्पतीशास्त्रामधून केले. मात्र, तिला करिअरची वेगळी वाटच निवडायची होती. ज्याद्वारे तिच्या पालकांना तिचा अभिमान वाटेल. ही नोकरी मिळवताना सहकार्य मिळालेल्या सर्वांचे ती मनःपूर्वक आभार मानते.

Input your search keywords and press Enter.