Now Reading:
या ५ ठिकाणी कडकीच्या दिवसातही फक्त ₹५,००० मध्ये वीकेंडला करता येईल भारतभर सैर
या ५ ठिकाणी कडकीच्या दिवसातही फक्त ₹५,००० मध्ये वीकेंडला करता येईल भारतभर सैर

“चल ना रे वीकेंड आलाय मस्त फिरून येऊ”
“नाही रे कडकी लागलीय.. पैसे नाहीयेत”

असं बरेचदा होतं ना? या नादात वर्षभरातील विकेंड असेच वाया जातात. म्हणूनच घेऊन आलोय अशी ठिकाणं जिथे तुम्ही केवळ पाच हजाराच्या बजेटमध्ये फिरून येऊ शकता.

१. ऋषिकेश –

रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध या गंगाकाठच्या ठिकाणी तुम्ही स्वस्तात राहू शकता. ऑनलाईन सुद्धा तुम्हाला १०००-१५०० मध्ये कॅंपिंगच्या बुकिंग करता येतील. इथल्या आश्रमांतसुद्धा १५० रुपयांत राहायची व्यवस्था होते. ७०० रु. मध्ये रिव्हर राफ्टिंग, २०० रु. मध्ये रॉक क्लाइम्बिंग करता येते.

२. बनारस –  

स्ट्रीट फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी बनारसच्या आध्यात्मिक गंगेच्या घाटासारखी दुसरी जागा नाही. तसेच इथे राहण्याची सोय पण फार स्वस्त आहे व इतर शहरांशी संपर्कही फार चांगला आहे.

३. मॅक्लिओडगंज –

हिमाचल प्रदेशमधील हे ठिकाण निसर्गसौंदर्याने संपन्न आहे. इथे पोहोचणं थोडं खर्चिक असलं तरी मॅक्लिओडगंज व धर्मशाळा हा परिसर ६-७ किमीच्या वर्तुळात सामावला आहे आणि राहण्याची सोयही स्वस्त आहे.

४. हंपी – 

आंध्रप्रदेशमधील हे पुरातनकालीन ठिकाण. इथे प्राचीन संस्कृतीतील मंदिरे, स्मारके, तसेच प्राचीन जीवनशैलीतील पायाभूत सुविधांच्या इमारतींचे अनोखे नमुने पाहायला मिळतील. ऑक्टोबर ते मार्च दरम्यान इथे जाण्याची आदर्श वेळ आहे.

५.जोधपूर-

निळ्याशार घरांच्या चादरीने व्यापलेलं हे शहर शेजारच्या रखरखत्या वाळवंटाशी छान सांगड घालतं. इथले महाल, किल्ले, कापडी वस्तू, मंदिरे तुम्हाला चकित करून सोडतील. इथे तुमची ४०० रुपयात राहायची सोय होऊ शकते.

Input your search keywords and press Enter.