Now Reading:
९० च्या दशकातील या ५ मराठी मालिका ज्या तुम्हाला तुमच्या बालपणात घेऊन जातील
९० च्या दशकातील या ५ मराठी मालिका ज्या तुम्हाला तुमच्या बालपणात घेऊन जातील

९० च्या दशकात टीव्ही बघणे म्हणजे एक पारिवारिक समारंभ असायचा, सगळे आपापली कामं सीरिअलच्या वेळेप्रमाणे आवरायचे आणि एकत्रपणे टीव्ही समोर जमायचे. त्याकाळी सगळ्यांकडेच टीव्ही नसल्यामुळे मग हा पारिवारिक समारंभ सार्वजनिक बनायचा. तर अशाच या ९० च्या दशकातील काही आठवणीतल्या टीव्ही सिरीयल ज्या मनात घर करून गेल्या.

१. बंदिनी

अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर आवाजातील ती “बंदिनी…… बंदिनी….. स्त्री ही बंदिनी..” अशी हृदयद्रावक ताण ऐकली की मनाला चर्र्कन चटका लागून जातो. दुपारचे अडीच वाजले की घराघरातून हे एकच गाणं ऐकू यायचं आणि घरातील सगळी मंडळी टीव्हीला खिळून बसायची. सोबत महिलांच्या होणाऱ्या घुसमटीची गाथा सांगणारी ही कथा सर्वांनाच गदगदून आणायची.

२. आमची माती आमची माणसं–  

“ही काळी आई.. धनधान्य देई…” चा हा ठेका आजही कानावर पडतो. आपल्या उद्दिष्टांशी संलग्न कार्यक्रम क्वचितच पाहायला मिळतो. आजही हा कार्यक्रम तितक्याच ताकदीने शेतकऱ्यांचे कृषीविषयक प्रश्न सोडवतोय त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन देतोय.

३. बोक्या सातबंडे

 

दिलीप प्रभावळकरांच्या मिश्किल लेखणीतून अवतरलेली ही अवखळपणे हसवणारी मालिका! सतीश पुळेकर, वंदना गुप्ते यांची सहजसुंदर अदाकारी. एका गोजिऱ्या, खट्याळ मुलाची ही कहाणी.

४. नायक

आजच्या काळात पोलिसात, ऑफिसांत, कला क्षेत्रात जिकडे तिकडे नावलौकिक कमावणारी मराठमोळी टाळकी एकेकाळी “कसं जगायचं? कसं वागायचं?’ अशा हाळ्या मारत गल्लोगल्ली फिरत. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एक सकारात्मक आणि गोड चित्रण करणारी ही मालिका आणि तिचं शीर्षकगीत आजही सगळ्यांना कंठस्थ आहे.

५. दामिनी

सह्याद्री वाहिनीवर रोज साडेचारला कडाडणारी ही वीज! पत्रकारांच्या लेखणीसारखं धारदार शीर्षक गीत आणि दामिनीच्या भूमिकेचं शिवधनुष्य पेलणाऱ्या प्रतीक्षा लोणकर! महिला सक्षमीकरणासाठी टीव्ही जगताने बऱ्याच मालिका काढल्या त्यातील अव्वल पाचमध्ये दामिनी नक्कीच असेल.

Input your search keywords and press Enter.