Now Reading:
आपल्या तत्वांशी तडजोड न करता प्रामाणिकपणे काम करण्याकरिता महिलांसाठी ८ साधे नियम!
आपल्या तत्वांशी तडजोड न करता प्रामाणिकपणे काम करण्याकरिता महिलांसाठी ८ साधे नियम!

व्यक्तीचं अखंडत्व त्या व्यक्तीचा प्रामाणिकपणा आणि चरित्राच्या सुसंगतपणावर अवलंबून असतं.याचा दुसरा अर्थ असा की व्यक्तीचे अखंडत्व त्या व्यक्तीच्या अंतर्मनातील श्रद्धा व विश्वासांवर अवलंबून असते. परिस्थिती काहीही असली तरी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या मुलभूत विचारधारेनुसारच वागते.

 

समाजातील दूषित घटक

एक स्त्री म्हणून समाजामध्ये आपल्या तत्वांशी तडजोड न करता प्रामाणिकपणे वागणे हे आपल्यातच एक आव्हान आहे. कारण समाजात सतत असे घटक आडवे येतात जे तुम्हाला आपल्या स्वाभिमानाविरुद्ध कृती करण्यास भाग पाडत असतात.

आपल्यातील प्रामाणिकपणा (इंटेग्रिटी) कायम ठेवण्यासाठी खालील गोष्टींवर अंमल करा.

१. तुमच्याशी संलग्न विचार व तत्व असणाऱ्या व्यक्तींशी सोबत ठेवा.

२. तुमची मूल्य लिहून काढा व दैनंदिन जीवनात अंमलात आणा.

३. तुमच्या प्रामाणिकपणाला धक्का पोहोचेल अशा क्षणांची पारख करून ठेवा.

४. स्वतःच्या चरित्राबद्दल अधिकाधिक माहिती बाळगा.

५. तुमची वचने लिहून ठेवा आणि त्यांचे मनोभावे पालन करा.

६. तुमचा स्वाभिमान व आत्मविश्वास जपा.

७. संवाद क्षमतेच्या सुधारणेवर काम करा व बोलताना मनापासून बोलण्याची सवय ठेवा.

८. वागण्यामध्ये विनम्रता व संवेदनशीलता चिरंतर कायम ठेवा.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.