Now Reading:
६७ वर्षीय महिलेने जोपासलं उच्च शिक्षणाचं स्वप्न
६७ वर्षीय महिलेने जोपासलं उच्च शिक्षणाचं स्वप्न

एम. चेल्लठाई या वयाच्या ६७व्या वर्षी मद्रास विद्यापीठातून इतिहास विषयात एम. ए (M.A) झाल्या. वयाला एक अडचण म्हणून न बघता त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केलं. पण इतक्यावरच त्या थांबणार नसून, त्यांना कायद्याचा (Law) पण अभ्यास करण्याची इच्छा आहे.

५० वर्षांपूर्वी एम. चेल्लठाई यांच्या वडिलांनी त्यांचा कॉलेजचा अर्ज फाडून टाकला होता. ते उच्च शिक्षणाच्या विरोधात होते. यामुळे त्यांचे स्वप्न तिथेच अपूर्ण राहिले. काही वर्षांनंतर त्यांचं लग्न झालं. त्यांचे पतीदेखील उच्च शिक्षणाच्या विरोधात होते. यामुळे त्यांच्या स्वप्नांम अश्याने त्यांच्या स्वप्नाला एकप्रकारे अडथळा आला , पण ते संपलं नाही.

२०१३ मध्ये त्यांच्या पतीचं निधन झाल्यानंतर त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. स्वतःच्या रिटायरमेंट पेन्शनच्या पैशांमधून त्यांनी उच्च शिक्षण घेण्याची इच्छापूर्ती केली. त्यांच्या कधीच न मरणाऱ्या इच्छेला पाहून आम्ही चकीत आणि प्रेरित झालो.  चेल्लठाईच्या जीवन कथेतून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेलच त्याचसोबत तुम्हाला अभिमानही वाटला असेल?

Input your search keywords and press Enter.