Now Reading:
माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर झेंडा रोवणारी पहिली ५० वर्षीय गृहिणी; मिळवला पद्मश्री पुरस्कार!
माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर झेंडा रोवणारी पहिली ५० वर्षीय गृहिणी; मिळवला पद्मश्री पुरस्कार!

भेटा ५४ वर्षीय प्रेमलता अग्रवाल यांना, ज्या ठरल्या पहिल्या भारतीय महिला ज्यांनी सात समीट पार करून गाठलं जगातील सगळ्यात उंच शिखर. वयाच्या ५०व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणाऱ्या प्रेमलता यांना २०१३ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं.

प्रेमलता यांचा जन्म सुखिया पोखरी गावात, पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग या जिल्ह्यात झाला. प्रेमलता या उद्योगपती रामावतार अग्रवाल आणि शारदा देवी यांच्या कन्या आहेत. त्याचं बालपण एकत्र कुटुंबात गेलं. वयाच्या १८व्या वर्षी त्यांचं लग्न विमल अग्रवाल नावाच्या एका पत्रकाराशी झालं. 

काही वर्षानंतर जेव्हा प्रेमलता त्यांच्या मुलीला अॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी (साहसी खेळ) नाव नोंदवायला गेल्या तेव्हा त्यांची बचेंद्र पाल ह्यांच्याशी भेट झाली. पाल यांनी प्रेमलता यांना स्वतःचं नाव नोंदवण्यास प्रोत्साहित केलं आणि असा सुरु झाला त्यांचा प्रवास.

२९०२९ फूट उंचीवर सगळ्या संकटाना सामोरं जात हवा, पाणी, वादळ या सगळ्या गोष्टींवर मात करून प्रेमलता यांनी यशाचे शिखर गाठले. २० मे २०११ रोजी माऊंट एव्हरेस्टवर भारताचा झेंडा फडकला आणि हा दिवस इतिहासजमा झाला. प्रेमलता अग्रवाल यांच्या शौर्याला सलाम. 

Input your search keywords and press Enter.