Now Reading:
स्वतःच्या क्षेत्रात यश मिळवणाऱ्या ५ यशस्वी महिला
स्वतःच्या क्षेत्रात यश मिळवणाऱ्या ५ यशस्वी महिला

या स्त्रियांच्या अतूट मेहनतीने आणि कामगिरीने त्यांना आज एक नाव मिळवून दिलंय. आपापल्या क्षेत्रात त्यांनी कामगिरी बजावून सगळ्याच महिलांना अभिमान मिळवून दिला आहे.

 

१. गौरी शिंदे-

आजच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अग्रगण्य नाव म्हणून गौरी शिंदेकडे बघितले जाते. आपल्या कलाकृतींमधून समाजाचा आरसा लख्खपणे मांडण्यात तिचा हातखंडा आहे. ‘इंग्लिश विंग्लिश’ या आपल्या पहिल्या चित्रपटामधूनच भारतीय स्त्रीची मानसिकता तिने मांडली. नंतर आलेल्या ‘डिअर जिंदगी’तून मानसिक आरोग्याबाबत खेळकर पद्धतीने लोकांमध्ये जनजागृती केली. बदलत्या भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आश्वासक दिग्दर्शक म्हणून तिच्याकडे बघितले जाते.  

२. एकता कपूर-

‘द डर्टी पिक्चर’, ‘लव सेक्स और धोका’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, आणि ‘रागिनी एम. एम. एस.’ नावाचे चित्रपट बालाजी फिल्म्सने निर्मित केले. टीव्हीच्या सास बघू सिरिअल्स नंतर बालाजी फिल्म्सने घेतलेलं हे पुढचं पाऊल आहे.

 

३. केतकी पिंपळखरे-

मनात असलेल्या भावभावनांचे चित्रण प्रत्येकाला समोरिल कॅनव्हासवर उमटवता येतेच असे नाही. तसे करण्यासाठी एखाद्या माध्यमावर तुमची पकड मजबूत असावी लागते. मनातील भावनांचे चित्रण रंग आणि रेषांच्या माध्यमातून उत्तमपणे साकारता येणारी महिला चित्रकार म्हणजे केतकी पिंपळखरे. आपले विचार आपल्या कलाकृती स्पष्टपणे मांडण्याची ताकद तिच्यात आहे. तिच्या कलाकृतींचे प्रदर्शन मुंबई, चेन्नई, लंडन, ऑस्ट्रिया इत्यादी ठिकाणी भरते. तसेच त्यातून सामाजिक जाणीवेचे भानही जपले.

 

४. छिकी सरकार-

“पेंग्विन इंडिया” नावाची प्रकाशन कंपनी छिकी सरकार यांनी सुरु केली. वयाच्या २९व्या वर्षी त्या रँडम हाऊस इंडियाच्या मुख्य संपादक होत्या. आज पेंग्विन इंडिया वर्षाला जवळ जवळ २०० पुस्तक प्रकाशित करतं.

 

५. किरण नादार-

किरण नादार या म्युझियम ऑफ आर्टच्या अध्यक्ष आहेत. हे दिल्ली मध्ये स्थित आहे. त्यांनी हे म्युझियम लोकांसाठी मोफत ठेवले, कारण त्यांना कला प्रेमींसाठी काही तरी करण्याची इच्छा होती.

Input your search keywords and press Enter.