Now Reading:
हजारो गरिबांच्या डोळ्यांसमोरचा अंधकार मोफत दूर करणारी ३४ वर्षीय महिला डॉक्टर
हजारो गरिबांच्या डोळ्यांसमोरचा अंधकार मोफत दूर करणारी ३४ वर्षीय महिला डॉक्टर

वाराणसीच्या आध्यात्मिक वातावरणात वाढलेली ही महत्त्वाकांक्षी तरुणी डॉ. आंचल गुप्ता हाडांचे डॉक्टर असलेल्या आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत पुढे जाऊ लागली तेव्हा कोणालाच आश्चर्य वाटले नाही. तिचे वडील शेतकऱ्यांचा विनामूल्य उपचार करत असत. उपचाराचे पैसे परवडत नसल्याने ती मोठ्या मनाची माणसं त्यांना फीच्या मोबदल्यात अन्नदान करत असत. आंचलने बाबांकडून ही मशाल घेऊन अशाच अंधकारात चरफडणाऱ्यांचे आयुष्य प्रकाशमान करण्याचा निर्णय घेतला.

नेत्रम आय केअर-

आंचल एक नेत्रचिकित्सक आहे. ती दिल्लीमध्ये आपल्या ‘नेत्रम आय केअर चेंबर’मध्ये गरजू रुग्णांसाठी मेडिकल कॅम्पस भरवते. आजवर तिने आणि नेत्रम आय फाउंडेशनने १५० हून अधिक कॅम्प आयोजित केले आहेत. प्रत्येक कॅम्पला सरासरी २०० ते २५० लोकांची उपस्थिती लाभलीय. म्हणजे एकूण ६०,००० लोकांपर्यंत आंचलला पोहोचण्यात यश आलंय. यासोबतच तिने ५००० हून अधिक मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत.

अद्ययावत सुविधा

‘तमसोमा, ज्योतिर्गमया’ उपनिषदांतून प्रेरणा घेऊन आंचल लोकांना ‘तिमिरातूनी तेजाकडे’ नेण्याच्या या मोहिमेवर बाहेर पडली. ‘मॅक्स सुपर स्पेशालिटी’, ‘फोर्टिस मेमोरियल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट‘ सारख्या नामवंत संस्थांमध्ये काम केल्यावर आंचल २०१२ मध्ये आपल्या मूळ उद्देशाकडे वळली, आणि तिने ‘नेत्रम आय केअर फाउंडेशन’ स्थापन केले. एकेकाळी मूलभूत नेत्रचिकित्सक सुविधा पुरवणारे हे केंद्र आता अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गरजू रुग्णांवर उपचार करत आहे.

व्यवहारातून समाजकार्य-

आंचल जगाच्या व्यवहाराकडे कानाडोळा करत नाहीये. ती तिच्या कॅम्पचा खर्च तिच्या रेग्युलर क्लिनिकच्या उत्पन्नातील १० टक्के कमाईतून चालवते. तसेच खेड्यापाड्यातील लोकांशी स्मार्टफोन व व्हॉट्स अॅपद्वारे संपर्क साधून शक्य तितक्या लोकांवर किमान खर्चात इलाज करते.

All pictures have been taken from Netram’s Facebook page

Input your search keywords and press Enter.