Now Reading:
३ मिनिटांच्या कसरतीने कमी होईल पाठीचं दुखणं व सरळ उभं राहण्याचा त्रास
३ मिनिटांच्या कसरतीने कमी होईल पाठीचं दुखणं व सरळ उभं राहण्याचा त्रास

नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात कसरतीसाठी वेळच मिळत नाही. पण एक असा व्यायामप्रकार आहे ज्याने तुमचं स्वास्थ्यही सुधारतं व वेळही वाचतो. तो व्यायामप्रकार म्हणजे ‘प्लँक्स’!

‘प्लॅंक’च का?

प्लॅंक करण्याचे कारण हे की यात सर्व अंगांचा वापर होतो तसेच हा अवघ्या ५ मिनिटांत करण्यासारखा व्यायामप्रकार आहे.

१. पाठदुखीपासून आराम

प्लँक्स करताना तुमच्या स्नायूंना बळकटी मिळते आणि असं करताना कण्यावर सुद्धा ताण येत नाही.

२. पोटाच्या स्नायूंना मजबूती

हा व्यायाम योग्य प्रकारे केल्यास पोटाच्या व पाठीच्या स्नायूंना मजबुती येण्यास मदत होते.

३. तुमच्या पावित्र्यामध्ये लक्षणीय सुधारणा होईल

प्लँक्स केल्याने तुमचा उभं राहण्याचा पवित्रा सुधारतो. पाठीच्या कण्याच्या बळकटीमुळे तुम्ही जास्त वेळ ताठ उभे राहू शकता.

४. बसलेले असतानाही कॅलरी बर्न कराल

प्लँक्समुळे संपुर्ण शरीराच्या स्नायूंना कामी आणलं जातं. ज्यामुळे नित्यनेमाने प्लॅंक केल्यास नुसते बसून असतानाही शरीरातील ऊर्जेचं पतन होतं.

५. मानसिक स्वास्थ्य सुधारेल

तसे सर्वच प्रकारच्या कसरतीने मानसिक स्वास्थ्य सुधारतं, एकाग्रता वाढते, मनःशांती मिळते.

प्लॅंकची सवय कशी आत्मसात कराल?

१: छोटी सुरुवात करा

अगदीच ५ मिनिट प्लँक्सने सुरवात करू नका. २-३ मिनिटाच्या प्लँक्सनी सुरवात करा आणि हळूहळू २०-२० सेकंदांनी वेळ वाढवा.

२: बरोबर करा

हा व्हिडीओ पाहा आणि त्याप्रमाणे व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. 

३. वेळ ठरवा

सकाळी उठल्यावर आंघोळीपूर्वी किंवा ब्रश केल्यानंतर असं एखाद्या विशिष्ट कामानंतर प्लॅंक करा. जेणेकरून नित्याने प्लॅंक करण्याची आठवण राहील व वेळेचं नियोजनही होईल.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.