Now Reading:
पाणी पुरीची ही १० नावे माहितीयेत का?
पाणी पुरीची ही १० नावे माहितीयेत का?

पाणी पुरी हा एकमेव असा खाद्यपदार्थ आहे जो विविध संस्कृती असलेल्या या देशाला एकत्रित जोडतो. प्रत्येक प्रांतातील पाणी पुरीला त्याचं स्वत:च असं एक अस्तित्व आहे. या चाटची स्वतःची एक वेगळी चव आहे जी दुसऱ्या कुठल्या पदार्थाला नाही. तर भारतातील विविध राज्यांमध्ये पाणी पुरीला काय म्हणतात ते जाणून घेऊया.

१. पाणी पुरी

महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि नेपाळच्या काही भागात पाणी पुरी या नावाने ओळखलं जातं. पुरीत चट-पटीत चटणी सोबत कांदा आणि मॅश केलेले बटाटे खाण्यात वेगळाच आनंद आहे.

२. पुचका

बांग्लादेश, बिहार, बंगाल आणि झारखंड मध्ये याला पुचका म्हणतात. इथे पाणी पुरीत हिरव्या मिरच्या पण टाकल्या जातात.

३. गोल गप्पे

दिल्ली, जम्मू काश्मीर, हरियाणा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि पाकिस्तानात याला गोल गप्पे या नावाने ओळखलं जातं. ते पाणी पुरीत काबुली चण्याचा देखील वापर करतात.

४. पकोडी

गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये पकोडीच्या नावाने पाणी पुरीला ओळखलं जातं. शेव आणि पुदिनाने ही पाणी पुरी सजवली जाते.

५. पानीके पताशे

हरियाणाच्या काही भागांमध्ये पाणी पुरीला पानीके पताशे म्ह्णून ओळखलं जातं.

६. पानीके बताशे

उत्तर प्रदेशातील लखनऊ सारख्या अनेक भागात .पानीके बत्ताशे म्हणतात. इथे तुम्हाला पाच प्रकारचे बताशे चाखायला मिळतील.

७. गप चप 

ओडिशा आणि हैद्राबादमध्ये पाणी पुरीला गप चप म्हणतात.

८. फुलकी

उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात पाणी पुरीला फुलकी म्हणतात.

९. टिक्की

मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये पाणी पुरीला टिक्की म्हणतात.

१०. पडाका

उत्तर प्रदेशच्या अलीग्रह भागात पाणी पुरीला पडाकाच्या नावाने ओळखलं जातं.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.