Now Reading:
१० सोप्या मार्गांनी सुधारा तुमच्या झोपेचं स्वास्थ्य, आणि पळवून लावा चिडचिडेपणाला!
१० सोप्या मार्गांनी सुधारा तुमच्या झोपेचं स्वास्थ्य, आणि पळवून लावा चिडचिडेपणाला!

तरुण वयात झोप रितसर पूर्ण व्हायची. पण, जसजसं वय वाढतंय, जबाबदाऱ्या वाढतायत तसतसं झोपेचं प्रमाण कमी होत चाललंय. असं किती जणांसोबत होतंय? आपल्याला लहानपणी सांगितलं जायचं,

‘लवकर झोपे, लवकर उठे, त्यास आयु आरोग्य लाभे’

पण झोपेच्या स्वास्थ्यासाठी एवढंच पुरेसं नसतं.जर तुमच्या दिनक्रमाकडे कटाक्षाने लक्ष दिल्यास तुमच्या लक्षात येईल की दिवसातील प्रत्येक कामास लागणारा वेळ हा दिवसाअखेर तुमच्या झोपेवर परिणामकारक ठरतो.

खालील काही नियम नित्यनेमाने पाळा आणि पाहा कशी जादू घडते तुमच्या झोपेच्या स्वास्थ्यावर!

१. रोज सकाळी ठरलेल्या वेळीच उठा.

२. अलार्म स्नूझ करू नका, याने तुमचा मेंदू गोंधळात पडतो.

३. दुपारी २० मिनिटांहून जास्त झोपू नये.

४. प्रोटिन व कार्बोहायड्रेट युक्त आहार घेतल्यास दुपारी जास्त झोप येत नाही.

५. अधून मधून सूर्यप्रकाशात जा, जेणेकरून मेंदूला दिवसाचा अंदाज येतो.

६. दुपारी कॉफी पिऊ नका. दुपारच्या कॉफीचा परिणाम शरीरावर जास्त वेळ राहतो.

७. नेमका आहार घ्या, जेणेकरून रात्रीसुद्धा तुम्ही जेवू शकता.

८. झोपण्यापूर्वी अर्धा तास फोन, कॉम्प्युटर वापरणे टाळा.

९. झोपण्याचा एक नित्य-क्रम बनवा.

१०. दररोज ठरलेल्या वेळीच झोपी जा.

Input your search keywords and press Enter.